शिमला : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावतला ब्रँड अॅबेसडर बनवण्यासाठी हिमाचल राज्यासोबतच इतर राज्यांकडून ही प्रस्ताव आले होते. मात्र कंगनाने इतर राज्यांचे प्रस्ताव फेटाळून फक्त हिमाचलचा प्रस्ताव स्वीकारला.
तीन महिन्यापूर्वी हिमाचल सोबतच इतर राज्याचा ही ब्रँड अॅबेसडर बनण्यासाठी प्रस्ताव आलेले कंगनाने फक्त हिमाचलच राज्यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि इतर राज्यांचे प्रस्ताव फेटाळून लावले होते असे तीची बहिण आणि मॅनेजर असलेली रंगोलीने सांगितले आहे.
तसेच या विषयी कंगनाचे वडील अमरदीप रणावत यांनी म्हटले आहे की माझी मुलगी ही हिमाचलच्या भल्यासाठी सदैव कार्य करत राहील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.