www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तामिळ सुपरस्टार रजनीकांत याचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘कोचडयान’ अखेर शुक्रवारी देशभरातील सिनेगृहांत प्रदर्शित झालाय. रजनीच नाही तर त्याच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा खास ठरलाय... कारण, आपल्या आवडत्या एक वेगळंच रुप या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतंय.
प्रेक्षकांना एका थ्रीडी सिनेमातून जे अपेक्षित आहे अशा सर्वच गोष्टींसाठी हा सिनेमा लाजवाब ठरलाय. जवळपास दोन तासांच्या या सिनेमात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्शकांना आश्चर्याचे धक्के देता देता एक रोमांच उभा करण्याची ताकद दिसून येतेय. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन याचा आवाज सिनेमाच्या कथानकाच्या अंतरंगात घेऊन जातो. अमिताभचा भारीभक्कम आवाज कथानकाला अनुरुप वाटतो.
सिनेमाच्या कथानकात तुम्हाला फारसं नवं काही आढळणार नाही. या सिनेमाचा नायक एक असा व्यक्ती आहे जो खूप सामर्थ्यशाली आहे पण, वाईट विचारांच्या आणि प्रभावाच्या लोकांच्या दबावाखाली येऊन तो पराजित होतो. सिनेमाचं कथानक वेगळं वळण घेतं जेव्हा कथेच्या नायकाचा पुत्र कथेत एन्ट्री करतो. या नायकाचा मुलगा हुबेहुब त्याच्याच सारखा दिसतो. हिरोचा मुलगा आपल्या खास अंदाजात शत्रुंचा सामना करतो... आणि हिच आहे सिनेमाची कथा...
‘कोचडयान’ एक सामर्थ्यशाली आणि आपल्या प्रजेवर भरपूर प्रेम करणारा असा शासक आहे. कोचडयान आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी काहीही करण्यासाठी नेहमीच तयार असतो. त्याचा मोबदला म्हणून त्याची प्रजाही त्याच्यावर तितकंच प्रेम करतेय आणि त्याच्या प्रत्येक आदेशाचं पालनही करण्यासाठी सदैव तयार असते.
एका तरुणापासून ते वयोवृद्ध रजनीचा एक नवीन अवतार या सिनेमातून दिसतोय. हा अनुभव रोमांचकारी आहे. हा सिनेमा मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु, पंजाबी, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये जगभरातील जवळजवळ 2000 सिनेगृहांत प्रदर्शित झालाय.
हा पहिला भारतीय सिनेमा आहे जो मोशन पिक्चर्स तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं बनवण्यात आलाय. सिनेमात दीपिका पादूकोण, जॅकी श्रॉफ, आर शरद कुमार आणि इतर कलाकार आहेत. रजनीकांतची मुलगी सौंदर्य हिच्या या सिनेमाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.