हॉलिवूड अभिनेत्याला अमिताभसोबत पुन्हा भूमिका साकारण्याची इच्छा

अमिताभ बच्चनसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा असल्याचं लिओनार्डो डी केप्रियोने म्हटलं आहे. `द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट` साठी गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड जिंकणाऱ्या लिओनार्डोचा चित्रपट `द ग्रेट गेट्सबी` मध्ये अमिताभने एक छोटासा रोल केला होता.

Updated: Jan 14, 2014, 10:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अमिताभ बच्चनसोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा असल्याचं लिओनार्डो डी केप्रियोने म्हटलं आहे.
`द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट` साठी गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड जिंकणाऱ्या लिओनार्डोचा चित्रपट `द ग्रेट गेट्सबी` मध्ये अमिताभने एक छोटासा रोल केला होता.
लिओनार्डो म्हणतो, ``अमिताभ बच्चन हे एक प्रभावशाली अभिनेते आणि सज्जन व्यक्ती आहेत. जर मला संधी मिळाली, तर पुन्हा एकदा मी त्यांच्यासोबत काम करीन``
अमिताभ आपल्याला मिळालेली छोटीशी भूमिका ज्या पद्धतीने उत्साहात साकारतात, ती खरंचं कौतुकास्पद आहे
`द ग्रेट गेट्सबी` हा महानायक अमिताभ बच्चन पहिला चित्रपट आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.