जियाच्या मृत्यूनंतर `त्या`नंही केली आत्महत्या!

जिया खान हिच्या आत्महत्येच्या वृत्तानं अनेकांना धक्का बसला. हाच धक्का एका लहानग्यालाही पडला... हा धक्का इतका तीव्र होता की जियाच्या या लहानग्या ‘फॅन’नंदेखील जियाप्रमाणेच गळफास लावून आत्महत्या केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 5, 2013, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
जिया खान हिच्या आत्महत्येच्या वृत्तानं अनेकांना धक्का बसला. हाच धक्का एका लहानग्यालाही पडला... हा धक्का इतका तीव्र होता की जियाच्या या लहानग्या ‘फॅन’नंदेखील जियाप्रमाणेच गळफास लावून आत्महत्या केलीय.
जयपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या माहितीनुसार, १२ वर्षांच्या या लहानग्यानं मंगळवारी सकाळीच टीव्हीवर जियाच्या आत्महत्येची बातमी बघितली. जियाच्या मृत्यूनं त्याला प्रचंड धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की, या बातमीनंतर त्यानं डिव्हीडीवर जियाचा सिनेमा अनेक वेळा पाहिला. त्यानंतर घरी एकटाच असल्याची संधी साधत या चिमुरड्यानं गळफास लावून घेतला.

या मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, दुपारी जवळपास दोन वाजल्याच्या सुमारास दरवाजा उघडल्यानंतर तीनं तिच्या पोटच्या गोळ्याला फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत पाहिलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.