www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिने वयाचे 46 वर्ष पूर्ण केली आहेत. माधुरीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अनेक अभिनेत्रींची आयकॉन झाली आहे. तिने 1980-90 च्या दशकात नृत्य और स्वाभाविक अभिनयाच्या जोरावर आपली छाप पाडली.
5 मे 1967 साली मुंबईमधील मराठी कुटुंबात तिचा जन्म झाला. लहानपणापासून तिची डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र ती पूर्ण न झाल्याने तिने डॉक्टर असलेले आणि अमेरिकेत स्थायिक असलेले श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले.
माधुरीने 1984 मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या `अबोध` या सिनेमातून केली. त्यानंतर `एक, दो, तीन` हे गाणे त्याकाळी माधुरीसाठी नवीन क्रेज झाले होते.1990मध्ये प्रदर्शित झालेल्या `दिल` या सिनेमासाठी तिला दमदार अभिनयाचा फिल्म पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
माधुरी दीक्षितची जोडी अभिनेता अनिल कपूरसोबत खूपच फेमस झाली होती. अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी `तेजाब`, परिंदा`, `राम-लखन`, `किशन कन्हैया`, `जीवन एक संघर्ष`, `जमाई राजा`, `खेल` `बेटा`, `जिंदगी एक जुआ`, `राजकुमार`, `पुकार` हे हिट सिनेमे केले.
माधुरी दीक्षितला आतापर्यंत पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय भारतीय सिनेमाच्या योगदानाबद्दल 2008 मध्ये तिला नागरिक सम्मान पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. माधुरी दीक्षितने तिच्या सिने करियरमध्ये 70 सिनेमातून काम केले आहे. लग्नानंतर तिने `गुलाब गॅंग` आणि `डेढ़ इश्किया` या सिनेमातून कमबॅक केले.
माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.