www.24taas.com, मुंबई
बॉलिवुड सुपरस्टार दबंग खान म्हणजे आपला सलमान खान यंदा आपल्या ४७ वाढदिवशी कोर्टात हजर राहणार आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी करायची की नाही हे तो ठरवू शकत नाही आहे. येत्या २७ डिसेंबरला तो ४८ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. याच दिवशी २००७ च्या हिट-अँड रन प्रकरणात त्याला कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
येत्या २७ डिसेंबरला मी काहीच करणार नाही. मला माहित नाही की मी काय करणार आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वतः कोर्टात हजर राहणार आहे, असे स्वतः सलमानने सांगितले आहे. दरम्यान, सलमानला चिंकारा शिकार प्रकरणात जोधपूर येथील कोर्टात फेब्रुवारी महिन्यात हजर राहायचे आहे.
हिट-अँड-रन प्रकरणात मी मुंबईच्या एका कोर्टात हजर राहणार असल्याचे त्याने सांगितले. याबाबत सलमान म्हणाला २७ डिसेंबरला माझ्या वकिलांनी मला कोर्टात उपस्थित राहणे आवश्यक नाही, असे सांगितले तर मी जाणार नाही. परंतु, त्यांनी जर उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगितले तर मी नक्की त्या ठिकाणी जाणार आहे.
शाहरुख, आमिर आणि हृतिक रोशन मीडिया समोर आपला वाढदिवस साजरा करतात, परंतु, त्याच्या प्रमाणे मी असे काहीच करणार नाही.