मुंबई हल्ल्याचं चित्रण सिनेमांत

वास्तवात घडणा-या घटनाचं चित्रणं बॉलिवूडच्या सिनेमांमधून नेहमीच आपल्याला दिसत आलं आहे.अगदी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्लाही त्याला अपवाद नाही.. या हल्ल्याचं चित्रणही बॉलिवूडने सिनेमांमधून केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 22, 2012, 10:54 AM IST

www.24taas.com, मुंबई
वास्तवात घडणा-या घटनाचं चित्रणं बॉलिवूडच्या सिनेमांमधून नेहमीच आपल्याला दिसत आलं आहे.अगदी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्लाही त्याला अपवाद नाही.. या हल्ल्याचं चित्रणही बॉलिवूडने सिनेमांमधून केलंय.
मुंबई मेरी जान, WEDNESDAY, धोका, शूट आऊट एट लोखंडवाला या चित्रपटांमधून दहशहतवादाचं दर्शन आपल्याला मोठ्या पडद्यावर घडलं.. या चित्रपटांमधला थरार बघताना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.. मात्र, रिल लाईफमध्ये घडणारं हे नाट्य प्रेक्षकांनी २४ नोव्हेंबर २००८ साली म्हणजेच चार वर्षांपूर्वी प्रत्यक्षात अनुभवलं.
एखादं विमान किंवा वास्तू हायजॅक होणं, किंवा दहशतवाद्यांनी निरागस नागरिकांना ओलीस ठेवणं म्हणजे काय याचा अनुभव शेकडो लोकांनी चार वर्षांपूर्वी अनुभवला.. चित्रपटाच्या हीरोचा फाईट सिक्वेन्स किंवा त्याचं रिल लाईफमधल्या दहशतवाद्यांशी दोन हात करणं हे आपण अगदी समरसून बघतो आणि त्यावर चर्चाही करतो.. दहशतवाद्यांनी मुंबईची शान असलेल्या ताज हेरीटेज, ओबेरॉय पॅलेस, आणि रहिवासी इमारतीत घातलेला धुमाकूळ आठवला आणि रिल लाईफमधलचं वास्तवात घडल्याची जाणीव प्रत्येकाला झाली.
वास्तवाचं चित्रण चित्रपटांमधून करणा-या बॉलिवूडनेही ही सत्य घटना रिल लाईफमध्ये उतरवली... दहशतवादी हल्लात एकमेव जीवंत सापडलेला आतंकवादी अजमल आमीर कसाब चित्रपटाचा विषय झाला.. याचं उदाहरणचं द्यायचं झालं तर अशोक चक्र हा हिंदी सिनेमा दशहतवाद्याच्या या नाट्यावरचं आधारित.. AMBIENCE तर मराठी सिनेसृष्टीने कसाबला जीवंत पकडणा-या तुकाराम ओंबळेचं साहस समोर आणलं ते हॅलो जयहिंद चित्रपटातून.
वास्तवात घडणा-या घटनांचं चित्रण आपल्या चित्रपटांमधून बॉलिवूड नेहमीच करत आलंय.. आणि कसाबही त्याला अपवाद ठरला नाही.. वास्तवात घडलेल्या घटनेचं चित्रण चित्रपटात करतना दिग्दर्शक निर्माता नेहमीच काहीतरी ट्विस्ट अँन्ड टर्न देत असतात, मात्र, इथे वास्तवात घडलेल्या या घटनेमध्येही सिनेमॅटिक छटा सापडली.
गोपनीयता बाळगून कसाबला फाशी देण्यात आली. बुधवारची सकाळ उजाडलीचं ती अजमल आमीर कसाबला झालेल्या फाशीच्या बातमीने... अगदी फिल्मी स्टाईलने सागायचं झालं तर अजमल आमीर कसाबचा THE END झाला.