बिकिनीत उदय चोपडासोबत नरगिस फाखरी

अभिनेता रणबीर कपूर आणि कटरिना कैफ बिकीनी प्रकरणानंतर आता नवीन कपलचं नाव चर्चेत आलं आहे, उदय चोपडा आणि नरगिस फाखरी यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

Updated: Jan 4, 2014, 09:40 PM IST

www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
अभिनेता रणबीर कपूर आणि कटरिना कैफ बिकीनी प्रकरणानंतर आता नवीन कपलचं नाव चर्चेत आलं आहे, उदय चोपडा आणि नरगिस फाखरी यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.
उदय चोपडा आणि नरगिस फाखरीला मालदीवच्या किनारी नववर्षाचं सेलिब्रेशन करतांना पाहण्यात आलंय. एकाने आपल्या कॅमेऱ्यात फाखरीला बिकीनत कॅच केलंय. यावेळी नरगिस फाखरीसोबत उदय कपूरही होता. फोटोमध्ये नरगिस फाखरीने काळी बिकीनी घातली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मालदिवच्या समुद्रकिनारी उदय चोपडा आणि नरगिस फाखरी मस्तीच्या मूडमध्ये रंगलेले होते. या दोन्ही कलाकारांमध्ये अफेयर असल्याची चर्चा नेहमी असते, उदय चोपडाने मात्र नेहमीच यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
या पूर्वीचा चित्रपट मद्रास कॅफेच्या प्रमोशन दरम्यान, नरगिस फाखरीने मात्र उदय चोपडा आणि आपण चांगले मित्र असल्याचं सांगितलं आहे. मात्र मालदीवच्या समुद्रकिनारी घेतलेले फोटो ही दोस्ती चांगलीच नजिकची असल्याचं दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.