www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्रात मराठी सिनेमांची गळचेपी होण्याचे प्रकार अद्यापही सुरु असून येत्या शुक्रवारी रिलीज होणा-या `१९०९ ` या सिनेमाला थिअटर उपलब्ध करुन देण्यास मल्टीप्लेक्स मालकांनी नकार दिलाय.
तेलगू आणि तमीळ सिनेमांचे शोज लावण्यात येणार असल्याने कारण देत `१९०९ ` या सिनेमाचे शो लावण्यास मुंबई आणि पुण्यातील मल्टिप्लेक्सच्या मालकांनी नकार दिलाय. त्यामुळे केवळ मराठी सिनेमाच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेल्या क्रांतीका-यांवरही हा एक प्रकारे अन्याय आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिकचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या क्रांतीकारी तरुणांनी २१ डिसेंबर १९०९ ला केली होती. हा सगळा धगधगता इतिहास निर्माता अजय कांबळी यांनी `१९०९ ` या सिनेमातून रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे...मात्र मल्टीप्लेक्स मालकांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
`१९०९ ` या सिनेमाचे निर्माते अजय कांबळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. मल्टिप्लेक्समालक मराठी सिनेमाची गळचेपी करत असल्याचा आरोप कांबळी यांनी केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ