www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता जॉन अब्राहम याला आपल्या आगामी सिनेमाचं नाव ‘हमार बजाज’ ठेवण्यासाठी परवानगी नाकारलीय.
‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर... हमारा कल हमारा आज... हमारा बजाज’ म्हणत बाजारात दाखल झालेल्या बजाज ऑटोच्या ‘चेतक’ या स्कूटरला काही वर्षांपूर्वी चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. चेतकचं उत्पादन २००९ मध्ये बंद करण्यात आलंय. पण ‘हमारा बजाज’ हा टॅग अजूनही कंपनीच्या इतर उत्पादनांशी जोडलेला आहे.
जॉन अब्राहम एका नवा सिनेमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, आणि त्याच्या या सिनेमाचं नाव असणार आहे... हमारा बजाज... असं जेव्हा बजाज कंपनीच्या ऐकिवात आलं तेव्हा कंपनीनं ‘जए एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ विरुद्ध कोर्टाचा दरवाजा ठोठावला.
यावर निर्णय देताना एस. जे. काठावाला यांच्या न्यायालयानं जॉन अब्राहमच्या कंपनीला हे शीर्षक वापरण्यास परवानगी नाकारलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.