www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जखमी शाहरुख खान पुन्हा शुटींगसाठी हजर झालाय. सध्या तो फराह खानचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या `हॅपी न्यू इअर`च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
`अजून पूर्णपणे बरा झालेलो नाही, पण काम करू शकतो` असं शाहरुखने शुटींगवर परतल्यानंतर म्हटलंय. २३ जानेवारी रोजी सिनेमाच्या शुटींगदरम्यान तो चांगलाच जखमी झाला होता. यावेळीही, `हॅपी न्यू इअर`चंच शूट सुरू होतं.
यानंतर त्याला तब्बल तीन आठवड्यांपर्यंत आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु, या मंगळवारीच शाहरुख कामावर हजर झाला.
शाहरुखनं मंगळवारी रात्री ट्विटरवर लिहिलं `काम केलं, तुटलो-फुटलो, जखमी झालो, पण मी आता बरा आहे. मला फक्त माझं कामच समजतं. इतरांसाठी मी त्यांना न समजण्यासारखाच आहे`.
यंदाच्या वर्षात दिवाळीच्या मुहूर्तावर अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी, विवान शाह आणि दीपिका पादूकोण यांच्यासोबत `हॅपी न्यू इअर`मध्ये दिसणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.