पुरुष असल्याची लाज वाटतेय - शाहरुख खान

शाहरुख पुढे म्हणतो, आपल्या समाजानं आणि संस्कृतीमध्ये बलात्कार म्हणजे कामुकतेचं प्रतीक मानलं जातं. मला माफ कर कारण मीही याच समाजाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 29, 2012, 07:06 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप पीडित तरुणीच्या मृत्यूनं अवघा देशच हळहळतोय. नेते-अभिनेते सामान्यांत मिसळून मैदानावर उतरले नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपला संदेश पोहचवत आहेत. आपल्या भावना आणि संताप व्यक्त करत आहेत. अभिनेता शाहरुख खाननंही आपलं म्हणणं याच माध्यमातून मांडलंय.
शाहरुख ट्विटरवर म्हणतो, ‘आम्ही तुला वाचवू शकलो नाही. पण तुझा आवाज नक्कीच करारी आहे. तू खूप शूर मुलगी आहेस. तुझा आवाज आम्हाला ओरडून ओरडून सांगतोय की बलात्कार म्हणजे एखादी नकळत घडलेली गोष्ट असू शकत नाही’.
शाहरुख पुढे म्हणतो, आपल्या समाजानं आणि संस्कृतीमध्ये बलात्कार म्हणजे कामुकतेचं प्रतीक मानलं जातं. मला माफ कर कारण मीही याच समाजाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे.

बॉलिवूडकरांनाही या घटनेनं विचार करायला भाग पाडलंय. एका मुलीचा बाप असलेला शाहरुख म्हणतो, ‘मला मी एक पुरुष आहे याची लाज वाटतेय. मी तू उठवलेल्या आवाजात नक्कीच आवाज मिसळून लढेन. मी प्रत्येक स्त्रिचा मान राखीन... त्यामुळे मी माझ्या मुलीकडूनही मान मिळवू शकेन’.