श्रद्धाचा नाच आयटम डान्स नाही- शक्ती कपूर

‘आशिकी २’ सिनेमानंतर एकदम प्रसिद्धी पावलेली श्रद्धा कपूर आता करण जोहरच्या उंगली या सिनेमात आयटम साँग करणार आहे. मात्र या तिच्या डान्सला आयटम साँग म्हणण्याला तिचे वडील शक्ती कपूर यांचा मात्र विरोध आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 26, 2013, 04:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘आशिकी २’ सिनेमानंतर एकदम प्रसिद्धी पावलेली श्रद्धा कपूर आता करण जोहरच्या उंगली या सिनेमात आयटम साँग करणार आहे. मात्र या तिच्या डान्सला आयटम साँग म्हणण्याला तिचे वडील शक्ती कपूर यांचा मात्र विरोध आहे.
“श्रद्धाचं गाणं आयटम साँग नाही. ते लहान मुलांच्या पद्धतीचं नाजूक गाणं आहे. आमच्या कुटुंबात आम्हा सर्वांना एकमेकांबद्दल संपूर्ण माहिती असते. श्रद्धानेही माझ्यापासून काही लपवलेलं नाही. तिचा डान्स हा आयटम नंबर नसल्याचं मला माहित आहे. तिचा डान्स ‘धक धक’ सारखा आयटम नंबर नाही.” असं शक्ती कपूरचं म्हणणं आहे.
श्रद्धाचं हे आयटम साँग तुम्ही पाहाणार का? असं विचारल्यावर शक्ती कपूरने उत्तर दिलं, “का नाही? मी सगळ्यांचेच आयटम डान्स पाहातो. अभिनेत्याने कुठल्याही प्रकारच्या कामाला वाईट न ठरवता ते केलं पाहिजे. माझा मुलगा सिद्धांत आगामी ‘अग्ली’ या सिनेमात उघडा होऊन दृश्य देणार आहे. अनुराग कश्यपच्या सिनेमात तर त्याने अंडरवेअरवर डान्स केला आहे. जर रणबीर कपूर करू शकतो, तर सिद्धांत कपूर का नाही?”
‘उंगली’ सिनेमात इमरान हाश्मी, कंगना राणावत, रणदीप हूडा आणि संजय दत्त यांच्या भूमिका आहेत. या सिनेमात श्रद्धा कपूर आयटम साँग करणार आहे. थर अग्ली सिनेमात सिद्धांत कपूर काम करत असून त्याच्यासोबत रोहित रॉय, गिरीश कुलकर्णी आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांच्या भूमिका आहेत.
IANS

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.