श्रुती हसनचा हल्लेखोर सापडला

मुंबई प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (२७) हिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अशोक शंकर त्रिमुखे (३२) याला शनिवारी अटक केली. तो गोरेगावच्या चित्रनगरीतील कर्मचारी आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 24, 2013, 09:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (२७) हिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अशोक शंकर त्रिमुखे (३२) याला शनिवारी अटक केली. तो गोरेगावच्या चित्रनगरीतील कर्मचारी आहे.
हा व्यक्ती खूप दिवसांपासून श्रुतीचा पाठलाग करत होता. २७ वर्षीय श्रुतीनं, जसा आपला दरवाजा उघडला त्यानं श्रुतीचा गळा पकडला आणि घरात शिरण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसांपूर्वी वांद्रेतल्या श्रुतीच्या राहत्या फ्लॅटमध्ये सकाळी साडे नऊ वाजता, कोणीतरी बेल वाजवली. तिनं दरवाजा उघडताच या व्यक्तीनं तिच्या घरी घुसण्याचा प्रयत्न करून तिच्यावर हल्ला केला. श्रुती त्याला ओळख का दाखवत नाही आहे, त्याच्याशी बोलत का नाही, हे जाणून घेण्यासाठी त्यानं घरात शिरण्याचा हा प्रयत्न केल्याचं समजतंय. मात्र श्रुती या परिस्थितीला निर्भयतेनं सामोरी गेली. हल्लेखोराच्या हातावर दरवाजा मारत तिनं त्याला पिटाळून लावलं होतं0.
या प्रसंगानंतर श्रुती खूप घाबरली होती. हल्लेखोराला बरेचदा श्रुतीच्या सेटवर बघितलं गेलंय. श्रुतीनं तमिळ सिनेमांसह हिंदी सिनेमातही काम केलंय. बॉलिवूडमधील लक’ आणि ‘रमैया वस्तावैया’ या सिनेमात तिनं काम केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.