शाहरुखची ‘रक्षाबंधन’ ऑफर, दोन तिकीटांवर एक फ्री!

सुपरस्टार शाहरुख खाननं रक्षाबंधनानिमित्त आज विशेष ऑफर ठेवलीय. ही ऑफर आहे ‘चेन्नई एक्स्प्रेस’ बघण्यासाठी. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवणारा चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सगळ्यांना बघता यावा यासाठी, चित्रपटाच्या ‘दोन तिकीटांवर, एक फ्री’ अशी ऑफर दिलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 20, 2013, 11:59 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
सुपरस्टार शाहरुख खाननं रक्षाबंधनानिमित्त आज विशेष ऑफर ठेवलीय. ही ऑफर आहे ‘चेन्नई एक्स्प्रेस’ बघण्यासाठी. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवणारा चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सगळ्यांना बघता यावा यासाठी, चित्रपटाच्या ‘दोन तिकीटांवर, एक फ्री’ अशी ऑफर दिलीय.
बादशाहच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरात ही ऑफर आज २० ऑगस्टपुरती आहे. रक्षाबंधन आणि चित्रपटाचं यश शाहरुख सगळ्यांसोबत सेलिब्रेट करु इच्छितो.
जसा आपण ईद आणि स्वातंत्र्यदिन साजरा करतो, तसंच रक्षाबंधन साजरा करण्याची शाहरुखची ही पद्धत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाचं उत्तर म्हणून त्यांनाही थोडं प्रेम देण्याची शाहरुखची इच्छा आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं बॉक्स ऑफिसवर धूम माजवलीय. ९ ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटानं आतापर्यंत १८१.९३ कोटींची कमाई करुन आता २०० कोटींच्या दिशेने घोडदौड सुरू केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.