www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्यानंतर ताबडतोब ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांना हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय. एका खाजगी हॉस्पीटलमधल्या ‘आयसीयू’ विभागात त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
‘बेल्ले व्यू क्लिनिक’ या हॉस्पीटलच्या सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार, ‘गेल्या सोमवरी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सुचित्रा यांना जास्त त्रास व्हायला सुरुवात झाल्यानं त्यांना आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आलं’. सुचित्रा यांची नात, अभिनेत्री रायमा सेन हिच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची प्रकृतीत सुधारणा होतेय.
सध्या एकांतवासात जीवन जगणाऱ्या आणि बऱ्याच काळापासून बाहेरच्या जगापासून दूरच राहणाऱ्या ८२ वर्षीय या अभिनेत्रीला सध्या ऑक्सीजनवर ठेवण्यात आलंय.
सुचित्रा सेन यांनी १९५२ साली बंगाली फिल्म ‘शेष कोथाई’ पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होता. १९५५ मध्ये त्यांनी हिंदी सिनेमा ‘देवदास’मध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता.
‘मॉस्को फिल्म फेस्टीवल’मध्ये (१९६३) ‘सात पाके बांधा’ या सिनेमासाठी पुरस्कार प्राप्त करणारी सुचित्रा सेन ही पहिली अभिनेत्री ठरली होती. १९७८ मध्ये सोमित्रा चॅटर्जी यांच्यासोबत आलेल्या ‘प्रोनोए पाशा’ असफल ठरल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. २००५ साली त्यांनी कथित रुपात दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्यासाठीही नकार दिला होता... त्यांना सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहायचं नव्हतं, असं कारण यावेळी देण्यात आलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.