www.24taas.com, मुंबई
२०१२ मध्ये भारतात सर्वात जास्त सर्च झालेली गोष्ट आहे... सनी लिओन... हे आम्ही नाही तर हे सांगितलंय जगातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या सर्च इंजिन गुगलनं... ‘जिस्म २’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेल्या पॉर्न स्टार लिओनसाठी नेटीझन्सनं गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च मारलाय.
गुगलच्या या यादीत सनी लिओनच्या नंतर नंबर लागलाय तो, किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांचा तर उलटसुलट वक्तव्य करून ‘हेडलाईन्स’मध्ये आलेल्या पुनम पांडेचा या यादीत तिसरा नंबर लागतो.
करन जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ द्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेली आलिया भट्ट चौथा नंबरवर, नेहमीच वादात सापडणारे धर्मगुरू निर्मल बाबा पाचव्यात स्थानावर तर अमेरिकेतल्या प्लेबॉय नावाच्या प्रौढ मॅगझिनच्या कव्हर पेजवर वस्त्ररहित दिसलेली शर्लिन चोप्रानं सहाव्या स्थानावर आहे.
दिवंगत फिल्म दिग्दर्शक यश चोपडा हे या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. नुकतंच बेगम करीनाशी गाठ बांधणारा सैफ अली खान आठव्या स्थानावर तर डायना पेन्टी नवव्या स्थानावर आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांना या यादीत दहावं स्थान मिळालंय.