सलमानला आला राग, म्हणाला बिग बॉसचा हा शेवटचा सिझन!

बिग बॉस-७च्या सेटवर सलमान खानला राग आला आणि त्यानं हा सिझन आपला अखेरचा सिझन असल्याचं जाहीर केलं. टीव्हीवरील ‘बिग बॉस-७’ या रिअॅलिटी शोचा सलमान खान होस्ट आहे. या शोमध्ये बिग बॉसच्या घरात असलेल्या अभिनेता कुशाल टंडन यानं तनिषा मुखर्जी सोबत केलेल्या दुर्व्यवहाराला कंटाळून ही चेतावनी दिलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 28, 2013, 08:45 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
बिग बॉस-७च्या सेटवर सलमान खानला राग आला आणि त्यानं हा सिझन आपला अखेरचा सिझन असल्याचं जाहीर केलं. टीव्हीवरील ‘बिग बॉस-७’ या रिअॅलिटी शोचा सलमान खान होस्ट आहे. या शोमध्ये बिग बॉसच्या घरात असलेल्या अभिनेता कुशाल टंडन यानं तनिषा मुखर्जी सोबत केलेल्या दुर्व्यवहाराला कंटाळून ही चेतावनी दिलीय.
शोच्या शनिवारी प्रसारीत झालेल्या भागात सलमान खाननं कुशालला चांगलंच सुनावलं. सलमान म्हणाला की “तुम्हाला वाटत असेल की या शोमधून गेल्यानंतर तुमची प्रतिमा तुम्ही लगेच सुधारू शकाल, तर हे चुकीचं आहे.” सलमान म्हणाला “आपल्या चुकीच्या वागण्याचा आपल्या प्रतिमेवर परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणामही होतात, मी स्वत: हे भोगलंय. लोकांच्या मनात त्या गोष्टी कायम राहतात.” या भागामुळं बिग बॉसमध्ये माझा हा शेवटचा सिझन असेल, असंही सलमान म्हणाला.
रविवारी ट्विट करुन सलमाननं आपली मतं मांडली. सलमाननं आपल्या ट्विटमध्ये लिहीलंय, “बिग बॉसच्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे की दोन्ही स्पर्धकांना शोमधून बाहेर काढलं पाहिजे, मात्र तुम्ही जेवढं बघितलं, ऐकलं घटना केवळ तेवढी नाहीय.”
सलमान अजून लिहीतो, “तुम्ही केवळ एक तासाचा भाग बघता, मात्र मला पूर्ण आठवडाभर सगळंच पाहावं लागतं.” जर कोणत्या स्त्रीसोबत असा घाणेरडा व्यवहार कोणी करत असेल, तर सर्व स्त्री-पुरुषांनी या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. आतापर्यंत असं झालं नसेल तर आता व्हायला हवं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.