शाहीदला पाहीलं अन् थेट एक्झीटची वाट धरली

हिंदी सिनेसृष्टीतलं जुनी जोडपी एकमेकांच्या समोर आली की त्यांच वागण देखिल चर्चेचा विषय होतं. त्यात शाहीद करीनाच्या मोडलेल्या जोडीची तर बातचं न्यारी. ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या माजी प्रियकरासमोर जाणं किती अवघडलेपणाचं असतं त्याचा करीनाला प्रत्यय नवी दिल्लीत आला. नुकत्याच झालेल्या चित्रपट सोहळ्यात शाहीद करीना योगायोगाने समोरासमोर आले.

Updated: Jan 21, 2014, 09:12 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हिंदी सिनेसृष्टीतलं जुनी जोडपी एकमेकांच्या समोर आली की त्यांच वागण देखिल चर्चेचा विषय होतं. त्यात शाहीद करीनाच्या मोडलेल्या जोडीची तर बातचं न्यारी.
ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या माजी प्रियकरासमोर जाणं किती अवघडलेपणाचं असतं त्याचा करीनाला प्रत्यय नवी दिल्लीत आला. नुकत्याच झालेल्या चित्रपट सोहळ्यात शाहीद करीना योगायोगाने समोरासमोर आले.
त्याच झालं असं की स्टेजच्या मागं शाहीद सराव करत होता. करीनाला याची जाणीव नव्हती की शाहीद तिथं सराव करतोय. बेबो तिथं आल्या त्यानी शाहीदला पाहील अन् थेट एक्झीटची वाट धरली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.