मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघातील ऑलराऊंडर अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ याने केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे सध्या खळबळ माजली आहे.
फ्लिंटॉफने व्हायग्रासंबंधी एक खुलासा केला आहे. 'सेकंड इनिंग्ज' या त्याच्या दुसऱ्या आत्मचरित्राच्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमात बोलताना त्याने हा खुलासा केला आहे.
एका सामन्यादरम्यान व्हायग्राच्या गोळ्या खाल्याने त्याच्यावर रन आऊट होण्याची नामुष्की ओढवली होती.
त्याचे झाले असे की न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्राला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने फ्लिंटॉफचा बेडमध्ये खूप खराब 'फॉर्म' आहे, अशी एक बातमी विकली होती. या गोष्टीला चुकीचे ठरवण्याचा त्याने निर्णय घेतला होता. पण, त्याच दरम्यान तो एक टेस्ट सामना खेळत होता.
फ्लिंटॉफने त्यातील एका रात्री व्हायग्राच्या तब्बल तीन गोळ्या खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी त्याचे काय परिणाम होतील याचा विचार त्याने केला नाही. या गोळ्यांचा इफेक्ट किती काळ टिकेल हे त्याला माहित नव्हते. आणि त्याचा परिणाम म्हणजे तो दुसऱ्या दिवशी नीट धावता येत नसल्याने तो रन आऊट झाला. आता ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांनाही धक्काच बसला आहे.