जाफर काका-पुतण्या मुंबईच्या संघात

2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 26, 2013, 08:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...
रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेकडून खेळणा-या अरमानने हॅरिस शिल्डच्या फायनलमध्ये 473 रन्सची विक्रमी खेळी केली होती... तसंच 2010मध्ये अरमानने रेकॉर्डब्रेक 498 रन्सचीही खेळी केली होती... त्यामुळेच एवढ्याशा लहान वयात खो-याने रन्स करणा-या अरमानची निवड झाली नसती तर सर्वांनाच नवल वाटलं असतं...
संभाव्य 30 जणांमध्ये निवड झाल्याने अरमानला आता 1 जुलैपासून वांद्र्च्या एमसीए ऍकॅडमीत काका वासिम जाफरसह रोहित शर्मा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर नेट प्रॅक्टिस करण्याची संधी मिळणार आहे...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.