धोनीने धुतले, कार्तिकने कुटले!

मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार आणि शानदार खेळीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर ३०९ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 4, 2013, 08:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कार्डिफ
मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार आणि शानदार खेळीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर ३०९ धावांचे आव्हान ठेवले आहे. दिनेश कार्तिक १४० चेंडूच्या खेळीत शानदार १४६ धावा केल्या. यात १७ चौकार आणि एक षटकार लगावला. तर धोनीने ७७ चेंडूंच्या खेळीत शानदार ९१ धावा कुटल्या. यात ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.
सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरूवातीला हा निर्णय चुकला असे वाटले. भारताची ५ बाद ५५ अशी बिकट परिस्थिती झाली. त्यावेळी धोनी आणि कार्तिक मैदानात होते. पण त्यांनी जबाबदार आणि नंतर धुवाँधार फलंदाजी करून भारताला ६ बाद ३०८ धावापर्यंत पोहचविले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचल स्टार्क आणि मेके यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर मिचेल जॉन्सन आणि फ्लुकनर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
दिनेश कार्तिकचे दुसरे शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पर्यायी विकेट किपर म्हणून १५ मध्ये निवडलेल्या दिनेश कार्तिक याने श्रीलंकेनंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध लगोपाठ शतक ठोकले. श्रीलंकेविरूद्ध त्याने १०६ धावांची तर आज त्याने शानदार १४६ धावांची खेळी केली. या दोन खेळींमुळे दिनेश कार्तिकने संघातील स्थानासाठी दावा मजबूत केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.