www.24taas.com, चेन्नई
बंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियवर ख्रिस गेल नावाच्या वादळानं पुणे वॉरिअर्सच्या बॉलर्सची अक्षरश: पालापाचोळ्यासारखी अवस्था करून टाकली. मैदानातील एकही असा भाग नव्हता जिथे गेलने बॉल पाठवला नाही. सिक्स आणि फोरची अक्षरश: बरसात गेलने केली. त्याने सिक्स आणि फोरचा नजराणाच त्याने प्रेक्षकांना पेश केला. मात्र सिक्स फोर मारताना एकावेळेस गेलही चांगलाच कळवळला. सिक्स फोर मारताना कोणाचीही तमा न बाळगणारा गेल मात्र एक फोर मारल्यानंतर मात्र चांगलाच दुखावला.
१४ व्या ओव्हरमध्ये गेलने एक जोरदार फटका मारला. गेलचा हा फटका अडवण्याचं कोणालाही धारिष्ट झालं नाही. मात्र फोर गेल्यानंतर तो बॉल अडविण्यासाठी एक छोटासा चिमुरडा बॉल बॉय धैर्याने पुढे सरसावला. मात्र बॉलचा वेग असा काही होता की, त्या चिमुरड्याचे ते हात बॉल अडविण्यासाठी अपुरे पडले. आणि बॉलचा जोरदार आघात त्या चिमुरड्यावर झाला. आणि त्याच क्षणी.... गेलही चांगलाच कळवळला... चिमुरड्याच्या तोंडावर तो बॉल लागला आणि गेलच्या चेहऱ्यावरही काळजीच्या छटा उमटल्या. गेलला मैदानातच त्या मुलाची चिंता वाटू लागली. आणि बॉलर्सची अक्षरश: कत्तल करणारा गेल हा देखील हळव्या मनाचा आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं.
असाच प्रकार मागील वर्षीच्या आयपीएलमध्येही घडला होता. गेल्यावर्षी बंगळुरूकडून खेळताना गेलने असाच एकदा प्रेक्षकात सिक्स मारला होता. तेव्हा त्याचा सिक्स मारलेला बॉल एका मुलीला लागला होता. त्यावेळेस तिला रूग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र इथेही गेलने त्याच्यातील माणूसकी पुन्हा दाखवून दिली होती. त्या जखमी मुलीला भेटण्यासाठी तो रूग्णालयात देखील गेला होता. माणुसकीला धरून वागणाऱ्या गेलचा साऱ्यानीच आदर्श घ्यायला हवा.