www.24taas.com, झी मीडिया, वेलिंग्टन
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट टीमची धुरा जर विराट कोहलीला दिली तर पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या जिंकण्याच्या शक्यता वाढतील असे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांनी व्यक्त केले आहे.
भारताला विश्व विजेता हा किताब आबाधित ठेवायचे असेल तर मला वाटते की धोनीने आता आराम करण्याची गरज आहे. केवळ न खेळून आराम घेणेच शक्य आहे असे नाही तर त्याने त्याच्यावरील भार कमी करायला हवा. वर्ल्ड कपपर्यंत त्याने टेस्ट टीमची धुरा ही दुसऱ्याकडे सोपविण्याची गरज आहे. त्यामुळे फ्रेश होऊन वर्ल्ड कपची तयारी केली तर भारताला नक्की फायदा होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दुसरी टेस्ट मॅच ड्रॉ झाली. या मॅचमध्ये मॅक्क्युलम याने शानदार त्रिशतकीय खेळी केली. त्रिशतक झळकावणारा तो पहिला किवी खेळाडू आहे. त्यावर बोलताना क्रो म्हणाले, तो शानदार खेळाडू आहे. तो सर्व फॉर्मेटमध्ये खेळतो. तो टेस्ट क्रिकेटला कोणत्या नजरेने पाहतो हे मला समजत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.