www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी `साइड स्ट्रेन`च्या कारणामुळे बांग्लादेशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया कपमधून बाहेर पडलाय. जखमी झाल्यामुळे धोनी आशिया कप खेळताना दिसणार नाही. डॉक्टरांनी धोनीला दहा दिवसांचा आराम करण्याचा सल्ला दिलाय.
धोनीच्या गैरहजेरीत विराट कोहलीकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. धोनीऐवजी दिनेश कार्तिकला `विकेट किपिंग`साठी निवडण्यात आलंय. बीसीसीआयनं गुरुवारी ही माहिती जाहीर केलीय. बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे धोनी १० दिवसांसाठी सुधार कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान धोनींच्या स्नायूंना दुखापत झाली होती. टीम इंडिया गुरुवारी न्यूझीलंडहून भारतात परतली. न्यूझीलंडमध्ये एकाही मॅचमध्ये टीम इंडियाला यश मिळालं नव्हतं. आशिया कपमध्ये भारताची पहिली मॅच २६ फेब्रुवारी रोजी बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. ही टूर्नामेंट ८ मार्च रोजी संपणार आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचं आयोजन २१ मार्चपासून बांग्लादेशमध्येच होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.