दुष्काळग्रस्तांसाठी IPLचा सामना घ्यावा – वेंगसरकरांचा पुढाकार

इंडियन प्रिमियर लीगच्या फायनल मॅचनंतर दुष्काळग्रस्तांसाठी आणखी एक फायनल मॅच खेळवावी मागणी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 6, 2013, 06:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंडियन प्रिमियर लीगच्या फायनल मॅचनंतर दुष्काळग्रस्तांसाठी आणखी एक फायनल मॅच खेळवावी मागणी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलीय.
या संदर्भात त्यांनी बीसीसीआयला पत्रही लिहिलंय. 26 मे ला आयपीएलची फायनल रंगणार आहे. यानंतर 28 मे ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अथवा नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडीयमवर खेळवण्यात यावी असं वेगंसकरांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
या मॅचमधून मिळणा-या निधीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत होईल असंही वेंगसरकर यांनी म्हटलंय.. आता बीसीसीआय यावर काय उत्तर देतंय ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
नेमका पत्रात काय आहे मजकूर
भारताचा आणि मुंबईचा माजी कर्णधार असल्याने मी हे पत्र लिहित आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जनता सध्या दुष्काळाने होरपळते आहे. बीसीसीआयने नेहमी अशा घटनांच्यावेळी मदतीचा हात दिला आहे. त्यामुळेच मी बीसीसीआयला विनंती करतो, की आयपेल फायनलनंतर एक आणखी फायनल घ्यावी. २८ मे रोजी ही फायनल वानखेडे किंवा डी. वाय पाटील स्टेडिअमवर खेळविण्या यावी. या मॅचमधून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात यावा.....
आपला
दिलीप वेंगसरकर.