www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंघम
इंग्लडने ठेवलेल्या २६९ धावांचा पाठलाग करता करता ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २२१ धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकून इंग्लडने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून २६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर २७० धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून अलेस्टर कूक (३०), बेल (९१),बोपारा नाबाद (४६) यांची महत्त्वाची कामगिरी ठरली. अॅडरसनने तीन विकेट घेत इंग्लकडून वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बेली ह्युज (५५) याने एकाकी झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. पीटर ह्युज (३०), शेन वॉटसन(२४), यांच्या कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला २२१ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजमध्ये जॉन्सन आणि फॉकनर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
इंग्लडच्या खेळ प्रदर्शनाबाबत कर्णधार कूक म्हणाला की, जरी आमची फलंदाजी धीम्या गतीने झाली असली, तरी २६९ हा स्कोअर चांगला होता. सुरूवातीला जलद गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.