www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
टीम इंडियाला दुसऱ्या वन-डेमध्येही १३१ रन्सनं लाजीरवाण्या पराभवाला सामोर जाव लागलं. पहिल्या दोन्ही वन-डे गमावल्यामुळं तीन वन-डेची सीरिजही टीम इंडियाला ०-२नं गमवावी लागलीय. प्रथम बॉलर्सना आफ्रिकेच्या ओपनर्सला रोखण्यात अपयश आलं आणि नंतर बॅट्समनची आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर उडालेली तारांबळ यामुळंच टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं.
दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वीच जी भीती व्यक्त केली जात होती ती खरी ठरली. आफ्रिकेच्या बाऊंसी पिचवर आणि त्यांच्या तेज तर्रार माऱ्यापुढं धोनी अँड कंपनी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. पहिल्या वन-डेनंतर दुसऱ्या वन-डेमध्येही १३४ रन्सनं टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. या पराभवाबरोबरच टीम इंडियानं तीन वन-डेची सीरिज ०-२नं गमावली.
टॉस जिंकून आफ्रिकेला प्रथम बॅटिंगला आमंत्रित केल्यानंतर पहिल्या वन-डेप्रमाणं आफ्रिकेच्या कॉक आणि आमलानं शतकी पार्टनरशीप केली. कॉक आणि आमला या दोघांनीही सेंच्युरी झळकावत १९४ रन्सची ओपनिंग दिली. यामुळंच दक्षिण आफ्रिका २८१ रन्सचं आव्हान टीम इंडियासमोर उभ करु शकली.
२८१ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या बाऊंसी पिचवर आणि तेज तर्रार
माऱ्यापुढं भारतीय बॅट्समनची चांगलीच तारांबळ उडाली. टीम इंडिया केवळ १४६ रन्समध्येच ऑल आऊट झाली. भारताकडून सर्वाधिक ३६ रन्स या रैनानं केल्या. तर शिखर धवन आणि विराट कोहली तर खातंही उघडू शकले नाहीत. रोहित शर्माही १९ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
आफ्रिकेकडून त्सोत्सोबेनं सर्वाधिक ४ तर डेल स्टेननं ३ विकेट्स घेतल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दोन्हीही वन-डेमध्ये भारताचे केवळ बॉलर्सच नव्हे तर बॅट्समनही सपशेल अपयशी ठरले. तिथल्या वातावरणाशी, तिथल्या बाऊंसी पिचशी आणि त्यांच्या वेगवान बॉलर्सचा मुकाबला करण्याच टीम इंडिया अपयशी ठरली यामुळंच टीम इंडियाला वन-डे सीरिज गमवावी लागली.
दरम्यान, कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनं बॅट्समन मॅचच्या पराजयासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं. पहिल्या वनडेच्या तुलनेनं बॉलर्सनं दुसऱ्या वनडेमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र बॅट्समन शॉट्स मारतांना चुकले, असं धोनी म्हणाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.