www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुढील वर्षी बांगलादेश इथं होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीनं वेळापत्रकाची घोषणा केली आहे. १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या २२ दिवसांच्या टी-२० चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग मॅच असणार आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी.
यावेळी आयसीसीनं टी-२० चॅम्पियनशीपकरता टीमची संख्या १२हून वाढवत १६पर्यंत नेली आहे. टी-२० चॅम्पियनशीपची मुख्य टूर्नामेंट टॉप टेन टीम्समधील दोन ग्रुपमध्ये विभागली जाणार आहे.
ग्रुप एमध्ये श्रीलंका, इंग्लंड, द. आफ्रिका, न्यूझिलंडसह क्वालिफायर ‘ग्रुप बी’मधील विजेती टीम सहभागी असेल. तर ग्रुप बीमध्ये गतविजेत्या वेस्ट इंडिजसह, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि क्वालिफायर ‘ग्रुप ए’मधील विजेत्या टीमचा सहभाग असेल.
८ ऑक्टोबरपर्यंत रँकिंगमध्ये पहिल्या आठ पोझिशनवर असणाऱ्या टीम्सना मेन राऊंडमध्ये सरळ प्रवेश मिळाला असून. बांग्लादेशला मुख्य स्पर्धेत सहभागी होण्याकरता क्वालिफायर राऊंड्स खेळावे लागणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.