मोहालीत चौथा सामना, इंडियाला विक्रमाची संधी

मोहालीतील चौथ्या वनडेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला अजून एक नवा विक्रम रचण्याची संधी आहे.भारताला सर्वाधिक वनडे विजय मिळवून देणा-या कॅप्टन्सच्या लिस्टमध्ये धोनीला दुस-या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं ७६ विजय मिळवले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 22, 2013, 07:20 PM IST

www.24taas.com,मोहाली
मोहालीतील चौथ्या वनडेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला अजून एक नवा विक्रम रचण्याची संधी आहे.भारताला सर्वाधिक वनडे विजय मिळवून देणा-या कॅप्टन्सच्या लिस्टमध्ये धोनीला दुस-या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं ७६ विजय मिळवले.
यापूर्वी अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारतानं ९० विजय मिळवले तर सौरव गांगुलीच्या कॅप्टन्सीत भारतानं ७६ वनडे विजय मिळवलेत. महत्वाचं म्हणजे धोनीची विजयी सरासरी अझरुद्दीनं आणि गांगुलीपेक्षाही सरस आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथी मॅच उद्या बुधवारी मोहालीच्या मैदानात रंगणार आहे. पाच वनडेच्या सीरिजमध्ये टीम इंडिया २-१ नं आघाडीवर आहे. आणि आता मोहालीत टीम इंडिया सीरिज जिंकण्याच्या इराद्यानं उतरेल तर सीरिज वाचवण्यासाठी इंग्लंडला काहीही करुन ही वनडे जिंकणं गरजेचं आहे..

रांचीत कॅप्टन धोनीच्या घरच्या मैदानात इंग्लंडला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडिया आपली सीरिज जिंकण्याच्या इराद्यानं मोहालीत उतरणार..शेवटच्या वनडेआधीच सीरिज जिंकण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाला मोहालीत चालून आलीय. मोहालीमधील आकडेही टीम इंडियाच्या बाजूनेच आहेत.

१९९३मध्ये मोहालीत झालेली पहिली वनडेही टीम इंडियानं जिंकली होती. त्यानंतर एकूण अकरावनडेत टीम इंडियानं ७ वेळा बाजी मारलीय तर फक्त ४वेळा वनडे गमावलीय. मोहालीत टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये फक्त एकच वनडे झालीय आणि तीही टीम इंडियानेच जिंकलीय.
मोहालीचं मैदानही टीमसाठी लकी असलं तरी टीम इंडियाला मोहालीत विजय मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणारए. कारण एखाद्या घायाळ वाघाप्रमाणे इंग्लंडची टीम आघात करण्याच्या तयारीत आहे. पहिली वनडे जिंकल्यानंतर दुसरी आणि त्यापाठोपाठ तिसरीही वनडे गमवावी लागल्यामुळे हे दोन्ही पराभव इंग्लंडच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. आणि सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी इंग्लिश प्लेअर्स वाटेल ते करायलाही मागे पुढे पाहाणार नाहीत.
टीम इंडियाला फक्त एकच चिंता सतावतेय ती म्हणजे ओपनिंगची गंभीर आणि रहाणे यांची जोडी जमताना दिसत नाहीय. आणि त्यामुळेच मोहालीत चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आली तर आश्चर्य वाटायला नको. विराट, युवी रैना आणि धोनी सध्यातरी मिडल ऑर्डरची धुरा सांभाळताना दिसतायत..तर बॉलिंग डिपार्टमेंटही समाधान कारक कामगिरी करताना दिसलय.रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन आपल्या फिरकीनं तर भुवनेश्वर कुमार, ईशांत आणि शमी अहमदही इंग्लिश बॅट्समन्सला रोखण्यात यशस्वी ठरतील.
आता युवीच्या मोहालीत टीम इंडिया सीरिज काबीज करते की इंग्लिश सीरिजमध्ये कमबॅक करेल याकडेच क्रिकेट फॅन्सच लक्ष लागून राहिल आहे.