टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला व्हॉईट वॉश देणार?

दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी कांगारुंची इनिंग २६२ रन्सवर गुंडाळल्यावर टीम इंडियाने चांगली सुरुवात केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 23, 2013, 08:03 PM IST

www.24taas.com, दिल्ली
दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी कांगारुंची इनिंग २६२ रन्सवर गुंडाळल्यावर टीम इंडियाने चांगली सुरुवात केलीय.
मुरली विजयसमवेत चेतेश्वर पुजारा ओपनिंगसाठी मैदानात उतरलाय. दोघांनी दहा ओव्हर्समध्ये पन्नास रन्सची पार्टनरशिप केलीय. यामुळे मुंबईच्या अजिंक्य रहाणेला आता मिडल ऑर्डरला बॅटिंग करावी लागणार आहे. चार टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे कांगारुंना क्लिन स्विप देण्याची धोनी एँड कंपनीला ही सुवर्णसंधी आहे.

ऑस्‍ट्रेलियाने ऑल आऊट २६२ रन्स केले. टीम इंडियाकडून अश्विन ५, ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाने २-२- तर प्रग्‍यान ओझानं एक विकेट घेतली. ऑस्‍ट्रेलियाकडून पीटर सिडल ५१, स्‍टीवन स्मिथ ४६, फिलीप ह्यूज ४५, कोवान ३८ आणि पॅटिन्‍सनने ३० धावा केल्‍या. शेवटचा गडी जेम्‍स पॅटिन्‍सनला बाद करीत प्रग्‍यान ओझाने आपल्‍या शंभराव्‍या बळीची नोंद केली.