www.24taas.com,नाशिक
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता.
सचिन तेंडुलकरनं यावेळी दिलखुलास मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे महत्वाचे निर्णय हे साहित्य सहवासमध्येच घेतल्याचही त्यानं यावेळी सांगितलं.
सचिन तेंडुलकरनं आपल्या यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा मोला वाटा असल्याचं सांगितंल आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआयच्या धोरणांमुळे क्रिकेटला प्रोत्साहन मिळत असल्याचही त्यानं म्हटलं आहे. युवा क्रिकेटपटू जिगरबाज असल्याची कबुलीही त्यानं दिली आहे.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिलखुलास मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे महत्वाचे निर्णय हे साहित्य सहवासमध्येच घेतल्याचही त्यानं यावेळी सांगितलं. व्हीव्हीएस-राहुलसारखे फलंदाज जगात दुर्मिळ असल्याची स्पष्टोक्ती देताना म्हटले, स्वप्नांचा पाठलाग करण्याचं आवाहन त्यांनी नवोदीतांना केले.
खेळण्यासाठी जिगर महत्त्वाची आहे. खेळात आक्रमकतेबरोबर विनम्रताही महत्त्वाची आहे. मी जे घडलो आहे, ते गुरू रमाकांत आचरेकर यांच्यामुळेच" असं मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.