सचिन तेंडुलकर होईल महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर - मुख्यमंत्री

काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2013, 10:52 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडरसाठी सचिनचा वेळ पाहून निर्णय घेण्यात येईल असं चव्हाण यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर बनण्यासोबतच कुपोषणासारख्या विविध प्रश्नांवर सचिननं जनजागृती करावी, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सचिन तेंडुलकरने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सचिनचा १९९वा कसोटी सामना कोलकातामध्ये होणार आहे. तर २०० वा सामना घरच्या म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर सचिन निवृत्त होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. असे असताना मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडरसाठी सचिनला गळ घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याबाबत त्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सचिन काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ