www.24taas.com , झी मीडिया, कोलकाता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली करिअसचं ऐतिहासिक २००वी टेस्ट मॅच आपल्या होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. बीसीसीआयच्या कोलकाता इथं झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजची टीम भारताच्या दौऱ्यावर येत आहे.
या दौऱ्यात दोन टेस्ट मॅच आणि तीन वन डे मॅचचा समावेश असेल. बीसीसीआयनं जाहीर केलेला हा दौरा म्हणजे सचिनच्या सांगतेची नांदी असू शकते. त्यामुळं सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीची शेवटची मॅच ही होमपीचवरच ठरू शकते.
वेस्ट इंडिजच्या नियोजित दौऱ्यानुसार ऑक्टो्बर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात सात वन डे मॅचेस खेळायला येणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार होता. त्यामुळं सचिनची 200वी कसोटी परदेशात झाली असती. मात्र, बीसीसीआयनं वेस्ट इंडिजबरोबर दोन टेस्ट मॅच आयोजित करून सचिनला मायदेशी 200वी टेस्ट मॅच खेळायची संधी दिली आहे.
तसंच सचिनला मायदेशात वाजत गाजत निवृत्त होण्याचीही संधी दिलीय, असाच तर्क लावण्यात येतोय. बीसीसीआयनं या दौऱ्यात मॅचेस कुठं होणार हे जाहीर केल्या नसल्या तरी येत्या काही दिवसांत त्या जाहीर होतील. दुसरी टेस्ट मॅच मुंबईत आयोजित केली जाणार आहे.
दरम्यान, कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला असला तरी, अजून यावर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून स्विकृती मिळायची आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.