कुमार संगकाराची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 17, 2014, 12:26 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलंबो
श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.
कुमार संगकाराचा हा पाचवा टी-२० वर्ल्डकप आहे. ३६ वर्षीय संगकारा टी-२०मधून निवृत्त होणार असला तरी तो टेस्ट मॅच आणि आयपीएलमध्ये खेळणार आहे. संगकारानं आतापर्यंत श्रीलंकेकडून ५० ट्वेण्टी- २० मॅचेसमध्ये खेळला आहे. त्यानं आतापर्यंत १३११ रन्स जमा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२० होता.
संगकारा २००९च्या ट्वेण्टी-२० वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा कॅप्टन होता. त्यानंतर २०१२मध्ये आपल्या टीमला २०१२च्या वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवलं. मात्र दोन्ही वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.