www.24taas.com, झी मीडिया,
एके काळी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्याची स्वप्नं पाहणार्यास वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यावर आता त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार आहे. साळवे चषकासाठी होणाऱ्या खेळात विराट कोहली कर्णधार असेल.
दिल्ली क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी एन. के. पी. साळवे चषकासाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये सेहवाग आणि गंभीरचा समावेश आहे; मात्र कर्णधार म्हणून विराट कोहलीला निवडण्यात आलं आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेला ५-0 ने `क्लीन स्विप` देण्याची किमया साधली होती.
अर्जुन पुरस्काराने सन्मानित विराटच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान इंदूरमध्ये होणार्या चॅलेंर्जस ट्रॉफी स्पर्धेत युवराजच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लू आणि युसूफ पठाणच्या नेतृत्वाखालील इंडिया रेड संघाविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघातून सध्या बाहेर असलेले दोन्ही सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांना फॉर्मात येण्यासाठी ही चांगली संधी आहे; परंतु त्यांना त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या कोहलीचं नेतृत्व स्वीकारावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.