www.24taas.com, मुंबई
बंगळुरूच्या ख्रिस गेलने काल आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करीत साऱ्यानांच अवाक् केलं. एकमेव द्वितिया... अशीच त्याची खेळी होती. आणि त्यानंतर मात्र फक्त गेल गेल.... आणि गेल असचं वातावरण होतं. त्यामुळे गेलच्या या धुव्वाधार खेळीने जणू काही क्रिकेटचे अनेक नियमच बदलून टाकले.
गेलच्या याच खेळीनंतर मात्र क्रिकेट रसिकांना एक वेगळीच गंमत अनुभवायला मिळाली. गेलने केलेल्या फटकेबाजीमुळे काही वेळातच अनेकांच्या मोबाईलवर एक एसएमएस येत होता. आणि तो एसएमएस वाचल्यानंतर हसत-हसत इतरांनाही तो फॉरवर्ड केला जात होता.
एसएमएस
ख्रिस गेलच्या तुफानी फटकेबाजीमुळे आयसीसीने ‘गेल’साठी क्रिकेटच्या नियमात बदल करण्यात आले आहे.
1. गेलला फक्त २४ बॉल (४ ओव्हर) खेळण्यासाठी देण्यात येतील. नाहीतर त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट करण्यात येईल.
२. एका ओव्हरमध्ये त्याला फक्त १ फोर आणि १ सिक्स मारता येईल.
३. २५०च्या वर जर त्याचा स्ट्राईक रेट असेल तर त्याच्या मानधनात कपात करण्यात येईल.
४. प्रत्येक ओव्हरमध्ये त्याने दोन रन धावून काढलेच पाहिजेत.
५. जेव्हा गेल बॅटींग असेल तेव्हा कोणत्याही प्रकारची फिल्डिंगवर बंधने असणार नाहीत.
६. जर कोणत्या प्रेक्षकांने जर कॅच पकडला तर गेल आऊट असेल.
अशाप्रकारे उपाहासात्मक असा हा एसएमएस सगळीकडे फिरत होता.