www.24taas.com, वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग
जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४५८ रन्सचं टार्गेट ठेवल आहे. २८४ रन्सच्या पुढे खेळताना चौथ्या दिवशी टीम इंडिया ४२१ रन्सवर ऑल आऊट झाली. पुजाराने १५३ रन्सची दमदार इनिंग खेळली. मात्र विराट कोहलीची सेंच्युरी हुकली. तर द.आफ्रिकेला ३२० रन्सची शेवटच्या दिवशी गरज आहे.
द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात २ विकेटच्या मोबदल्यात १३८ रन्स केल्यात. आफ्रिकेच्या अल्विरो पीटरसनचे अर्धशतक झळकावताना ७६ रन्स केल्यात. तर स्मितने ४४ रन्स केल्यात. तो रन आऊट झाला. त्याआधी भारताचा विराट कोहली ९६ रन्सवर आऊट झाला. यानंतर रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी अनुक्रमे ६ आणि १५ रन्सवर पॅव्हेलियमध्ये परतले. तळाला आर. अश्विनने २९ आणि झहीर खानने नॉट आऊट २९ रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वर्नन फिलँडर आणि जॅक कॅलिसने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर इम्रान ताहिर आणि जेपी. डेम्युनिने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
आता भारतीय बॉलर्स कशी कामगिरी करतात यावरच जोहान्सबर्ग टेस्टच भवितव्य अवलंबून असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्गमधील पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी २२२ रन्सची भागीदारी रचून भारताच्या दुसऱ्या डावाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली. पुजाराला माघारी धाडून जॅक कॅलिसने ती जोडी फोडली. पुजाराने १५३ रन्सची खेळी उभारली. मग कॅलिसनेच रोहित शर्माला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर कोहलीचं शतक अवघ्या चार रन्सनी हुकलं. त्यानंतर १९३ बॉलमध्ये नऊ चौकारांसह ९६ रन्सची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेतर्फे फिलँडर आणि जॅक कॅलिसने प्रत्येकी तीन तर इम्रान ताहीर आणि ड्युमिनीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने आपल्या पहिल्या डावात २८० रन्स केल्या होत्या. तर यजमान संघाचा पहिला डाव २४४ रन्सवर आटोपला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.