सचिनच्या मनात निवृत्तीचा विचार

सचिनने क्रिकेटला अलविदा करावं याबाबत माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि माडिया नेहमीच चर्चा करत असते. मात्र आता खुद्द मास्टर-ब्लास्टरच्या मनातच रिटायर्डमेंटचे विचार सुरू झाले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 5, 2012, 01:40 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
सचिनने क्रिकेटला अलविदा करावं याबाबत माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि माडिया नेहमीच चर्चा करत असते. मात्र आता खुद्द मास्टर-ब्लास्टरच्या मनातच रिटायर्डमेंटचे विचार सुरू झाले आहेत. जोवर आपण क्रिकेटचा एन्जॉय घेतोय तोपर्यंत आपण खेळतच राहणार असं म्हणणारा सचिन आता हळूहळू रिटायर्डमेंटचा विचार करू लागलाय.
नोव्हेंबरमध्ये ग्राऊंडवर उतरल्यावर आपल्या खेळाचा आढावा घेण्याचं त्यानं ठरवलंय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिनने हे स्पष्ट केलय. सचिनच्या मनात निवृत्तीचा विचार घोळू लागला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. मी आता ३९ वर्षांचा आहे आणि माझ्यात फारसं क्रिकेट उरलंय असं मला वाटत नाही. नोव्हेंबरमध्ये आपण सा-या बाबींचा फेरविचार करणार आहे. माझ्याकडून हवा तसा खेळ होत नाही असं ज्यादिवशी मला जाणवेल त्यावेळी मी निवृत्तीबाबत विचार करेन.
सचिनचं हे स्पष्ट मतच त्याच्या मनात रिटायर्डमेंटचे विचार घोळू लागल्याचे संकेत देतात. टी-२०वर्ल्ड कपपर्वी न्यूझीलंडविरूद्धच्या सीरिजमध्ये सलग तीनवेळा बोल्ड झाल्याने सचिनच्या रिटायर्डमेंटवर चांगलीच चर्चा रंगली होती. यामुळेच सचिन आता आपल्याच कामगिरीचा आढावा घेण्यासाठी सरसावला असून तो आता रिटायर्डमेंटबाबत विचार करू लागल्याचं स्पष्ट झालंय.
बंगळुरु टेस्टच्या दुस-या इनिंगमध्येही सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड झाला. पहिल्या इनिंगमध्येही सचिन क्लिन बोल्ड झाला होता. सचिन गेल्या चार टेस्टमध्ये तब्बल पाचवेळा बोल्ड झालाय. एवढच नाही तर १९० टेस्टमध्ये सचिन ५१ वेळा क्लीन बोल्ड झालाय. त्याच्या या हरवलेल्या फॉर्मवर टीका होऊ लागलीये.