www.24taas.com , झी मीडिया, कोलकाता
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सौरव गांगुलीनं मास्टर ब्लास्टर सचिनच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. खेळाडूंच्या निवडीबाबत सचिननं केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं सौरव गांगुलीचं म्हणणं आहे.
“बंगळुरुतल्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेला असतांना सचिननं जे मत मांडलं, तेव्हा मी सुद्धा तिथंच होतो. त्याचं वक्तव्य अतिशय साधं आणि सोपं होतं. कोणत्याही दुसऱ्या अर्थानं सचिननं हे वक्तव्य केलं नाही”, असं सौरव गांगुलीला म्हणाला.
टीमसाठी निवड करताना खेळाडूंच्या आकड्यांचा नाही, तर त्यांच्या योग्यतेचा आणि दबाव सहन करण्याच्या क्षमतेचा विचार करावा, असा सल्ला सचिननं निवड समितीच्या सदस्यांना दिला होता. सचिनच्या या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला होता. त्यामुळं आता सौरवनं सचिनची पाठराखण करत, त्याच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढू नये, असं सौरवला म्हणतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.