www.24taas.com , पीटीआय, कोलकाता
“मास्टर ब्लास्टरचा आनंद हिरावून घेऊ”, असा विश्वास व्यक्त केलाय वेस्ट इंडिजचं वादळ असलेल्या ख्रिस गेलनं. गेल म्हणाला, “सचिन हा महान क्रिकेटर आहे... त्याला आम्ही शानदार निरोप देऊ, पण टेस्ट मॅचमध्ये जिंकू देणार नाही”.
येत्या ६ नोव्हेंबरपासून वेस्ट इंडिट भारताच्या दौऱ्यावर आहे. सचिन तेंडुलकर २००व्या टेस्ट मॅचनंतर निवृत्त होतोय. त्यामुळं सचिनला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. सचिननं नुकतीच रणजी मॅचमध्ये आपला मास्टरस्ट्रोक दाखवत फटकेबाजी केली. त्यामुळं रणजी मॅच मुंबईला जिंकता आली. आता सगळ्यांचं लक्ष सचिनच्या १९९व्या आणि २००व्या टेस्टकडे लागलंय.
टेस्टमॅचमध्ये भारताविरुद्ध सेंच्युरी झळकावलेली नाही, त्यामुळं ही उणीव भरून काढण्याचा माझा प्रयत्न राहील, असंही गेल म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.