विराट कोहली बनला `मॅन ऑफ द टूर्नामेंट`

विराट कोहलीची बांगलादेश मध्ये झालेल्या आईसीसी टी-20 विश्व चषकात `प्लेअर ऑफ द टूर्नामेंट` म्हणुन निवड करण्यात आली. कोहलीने या चषकात सर्वात जास्त म्हणजे ३१९ धावा केल्या.

Updated: Apr 7, 2014, 02:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया

विराट कोहलीची बांगलादेश मध्ये झालेल्या आईसीसी टी-20 विश्व चषकात `प्लेअर ऑफ द टूर्नामेंट` म्हणुन निवड करण्यात आली. कोहलीने या चषकात सर्वात जास्त म्हणजे ३१९ धावा केल्या.
विराट कोहलीने रविवारी झालेल्या टी-20 विश्व चषकाच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध ७७ धावांची शानदार खेळी केली. पण या शानदार खेळीनंतर देखिल भारताला पराभव पत्करावा लागला.
कोहलीने पूर्ण मालिकेत सहा सामन्यात चार अर्ध शतक ठोकले. कोहलीने चार एप्रिल रोजी मीरपुर येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध उपान्त्य फेरीत ७२ धावांची विराट खेळी करत भारताला अंतिम सामन्यात पोहचवलं होत.
कोहलीने या मालिकेत पाकिस्तान विरुद्ध नाबाद ३६, वेस्टइंडिज विरुद्ध ५४, बांगलादेश विरुद्ध नाबाद ५७, ऑस्ट्रेलिया विरुद्ध २३, दक्षिण आफ्रिका विरुद्ध नाबाद ७२ आणि श्रीलंका विरुद्ध ७७ धावा ठोकल्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.