www.24taas.com, वृत्तसंस्था,मुंबई
न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. मात्र, धडाकेबाज युवराज सिंगला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तर नवोदीत स्टुअर्ट बिन्नीला वन डेमध्ये संधी देण्यात आलेय. ईश्वर पांडे यालाही वन डे संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंड विरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघ जाहीर केला. टीम इंडियामध्ये वरुण अॅरॉन, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडिया पाच वन डे आणि दोन टेस्ट खेळणार आहे. १९ जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेत युवराज सिंगला संधी मिळूनही कामगिरी उंचावता आली नव्हती त्यामुळे निवड समितीने त्याला संघातून डच्चू दिला आहे.
६ फेब्रुवारीपासून टेस्ट मालिकेला सुरुवात होईल. २०१५ ची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. त्यामुळे तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने हा न्यूझीलंड दौरा भारतीय संघासाठी महत्वाचा आहे.
टीम इंडियाचा संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार) शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुरेश रैना, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहोम्मद शामी, इशांत शर्मा, अमित मिश्रा, ईश्वर पांडे, स्टुअर्ट बिन्नी आणि वरुण अॅरॉन
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.