www.24taas.com, कोल्हापूर
दिवाळ सणासाठी कोल्हापूरनगरी सज्ज झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात इतर साहित्यासह सध्या नावीन्यपूर्ण आणि आकर्षक पणत्याही उपलब्ध आहेत. पण दिसायला अधिक आकर्षक, टिकाऊ आणि न गळणाऱ्या पणत्या बाजारात मिळाल्या तर?.... कोल्हापूरातील अशा पणत्या उपलब्ध आहेत
दिवाळी... अर्थात दिव्यांचा उत्सव... मनामनातील, वातावरणातील अंधकाररूपी दुःख, काळजी, उद्वेग दूर करत सौख्याचा, भरभराटीचा प्रकाश सर्वत्र पसरवणारा असा दिव्यांचा सण... अशा या दिवाळ सणासाठी वेगवेगळ्या आकारातल्या पणत्या बाजारात उपलब्ध असतात. मात्र कोल्हापुरातल्या रंकाळा टॉवर इथं राहणाऱ्या विजया पाटणकर अन् तिच्या कुटुंबाकडे आकर्षक तसंच तेल न गळणा-या पणत्या बनविण्यात येतात. गेल्या पाच वर्षांपासून विजया अशा पणत्या तयार करण्याचं काम करतेए. व्हाईट सिमेंट, मार्बल पावडर, स्टोन प्लॅस्टर, रंग, केमिकल कोटींग, मॅटेलिक कार पेंट, ऍक्रॅलिक पेंट, फॅब्रिक कलरचा वापर करुन तयार केलेल्या पणत्या दिसायला मोठ्या आकर्षक वाटतात.
आतापर्यंत विजया आणि तिच्या कुटुंबीयांनी तयार केलेल्या पणत्यांना कोल्हापूरातील लोकल मार्टेकटसह मुंबई, पुणे, गोवा, आणि देशातील इतर शहरांमध्ये मोठी मागणी आहे. पाटणकर कुटंबीयांनी तयार केलेल्या या पणत्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसलेंसारख्या दिग्गजांनीही पोचपावती दिली आहे. त्यामुळे दरवर्षी आणखी आकर्षक काम करण्याचा विजयाचा प्रयत्न असतो...