अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू, आंदोलन मागे

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2014, 08:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.
या निर्णयाची पुढील पंधरा दिवसांत अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचा इशाराही अंगवाडी सेविकांच्या संघटनांनी दिलाय. तर दुसरीकडे ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या सुधारित वेतनश्रेणीची मागणी मान्य होऊनही शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत. ऐन १२ वी परिक्षांच्या तोंडावर शिक्षकांनी आंदोलन सुरू ठेवल्यानं विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून निर्णय घेतला जात नसल्याने बुधवारी सुमारे पाच हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि कर्मचा-यांनी आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांशी भेट करवून देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडे केली. त्यास नकार दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको करून वाहतूक बंद पाडली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.