मनसेचे विद्यार्थ्यांसाठी करिअर फेअर सुरू....

वरळीच्या जांबोरी मैदानात ज्ञानमयी करिअर फेअरचं आयोजन करण्यात आलंय. `झी २४ तास`चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या फेअरचं उद्घाटन झालं.

Updated: May 3, 2013, 03:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वरळीच्या जांबोरी मैदानात ज्ञानमयी करिअर फेअरचं आयोजन करण्यात आलंय. `झी २४ तास`चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या फेअरचं उद्घाटन झालं.
३ मे ते ५ मे असा तीन दिवसाचा हा करिअर फेअर सुरू असणार आहे. विद्यार्थ्यांना करिअर निवडताना येणाऱ्या अडचणी यामुळेच या करिअर फेअरचे आयोजन करण्यात आलं आहे. मनविसेने हा स्तुत्य उपक्रम मागील काही वर्षापासून सुरू केला आहे.
मनविसेनं या करिअर फेअरचं आयोजन केलंय. विद्यार्थ्यांना आपलं करिअर निवडण्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त माहिती इथं मिळेल, असं संघटनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आणि विभाग अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटलंय.