विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र घराच्या जवळ - विनोद तावडे

बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आता घराच्या जवळ मिळणार आहे.

Updated: Jan 9, 2015, 09:07 PM IST
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र घराच्या जवळ - विनोद तावडे title=

मुंबई : बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आता महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आता घराच्या जवळ मिळणार आहे.

तसेच प्रश्नपत्रिकाही वेळेच्या आधी दहा मिनिटं मिळणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिलीय.

तर दुसरीकडे एक धक्कादायत बातमी. पुढच्या महिन्यात होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी आणि अनेक बोर्डाचे अधिकारी तयारीला लागलेले असतानाच प्रात्यक्षिक परीक्षेत पैसे देऊन पास करण्याचे एक रेकेट नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उघडकीस आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात हे रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणात एका शिक्षकाला विद्यार्थ्याकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी देत तसंच प्रात्यक्षिक परीक्षेत पासा करवून देण्यासाठी प्रशांत येळणे हा शिक्षक त्यांच्याकडून १००० रुपये उकळायचा. 

या लाचखोर शिक्षकाला अटक झाल्यावर बोर्डाने नागपूर विभागातील इतर शाळांना असे प्रकार टाळण्याकरता सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.