शिक्षक व्हायचंय, टीईटी (TET) परीक्षा जाहीर!

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा रविवारी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांनी ही परीक्षा दिलेली नाही, त्यांच्यासाठी संधी आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 25, 2013, 10:12 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा रविवारी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यांनी ही परीक्षा दिलेली नाही, त्यांच्यासाठी संधी आहे.
शिक्षण पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरिता “राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांना “शैक्षणिक प्राधिकरण” म्हणून घोषित केले आहे. “राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१० व दिनांक २९ जुलै, २०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ली ते ८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) TET अनिवार्य केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी नोंदणी दिनांक : २०ऑक्टोबर २०१३ रोजी सकळी ९.०० पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन नोंदणी आणि बँक शुल्क रकमेसाठी अंतिम तारीख : ११ नोव्हेंबर २०१३ आहे. तर बॅकेत फी भरलेल्याचे चलन व आवेदन पत्राची प्रिंट शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे पोहोचविण्याचा अखेरचा दिनांक: १५ नोव्हेंबर २०१३ आहे. अधिक माहितीसाठी http://mahatet.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थेट अर्ज भरण्यासाठी http://mahatet.in/TETAPP/Profile.aspx लॉग ऑन करा.
पाहा जाहिरात

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.