www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पॅरिसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सोलर स्पर्धेत आयआयटी पवई आणि रचना संसदमधल्या विद्यार्थ्यांची निवड झालीय. ७० जणांची ही `टीम शून्य` सोलर पॅनलचं अख्खच्या अख्खं घर त्यासाठी साकारत आहेत.
आंतरराष्ट्रीय सोलर स्पर्धेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सोलार डेक्थ्लॉन २०१४ युरोप या स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय टीमची निवड झालीय. ज्यात आयआयटी पवईचे ५० तर रचना संसद कॉलेजच्या २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ही ७० जणांची `शून्य` नवाची टीम सोलार ऊर्जेवर चालणारं घर बनवतेय. या घरात १६ सोलार पॅनल लावण्यात येणार आहेत. ज्याची किंमत ५ लाख रुपये आहे.
२० वर्षांपर्यंत या सोलार पॅनलचा वापर होऊ शकतो. या घराची किंमत २५-३० लाखांपर्यंत असून प्रोजेक्टसाठीचा संपूर्ण खर्च २ कोटीपर्यंत आहे. या घराचे भाग विद्यार्थी एका जहाजातून युरोपात घेऊन जाणार आहेत. पॅरिसमध्ये पुन्हा एकदा घराची उभारणी करण्यात येईल. १६जूनपासून पॅरिसमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
अमेरिकेचा ऊर्जा विभाग तसंच फ्रेंच सरकारकडून ही स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्यात येते. यंदा यावर्षी भारतासह १६ देशांनी सहभाग घेतला आहे. या प्रकल्पासाठी २ कोटी खर्च येणार आहे. आत्तापर्यंत फक्त ३ स्पॉंन्सर्स मिळालेत. त्यामुळे केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणी होतेय. या स्पर्धेत समावेश झाल्यामुळे `टीम शून्य`चं कौतुक होतंय. पण त्यांची खरी कसोटी लागणार आहे पॅरीसमध्ये.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.