www.24taas.com, मुंबई
एक काळ होता जेव्हा मोबाईल फोन केवळ कॉल करण्यासाठी वापरला जात होता...पण आता मोबाईल फोनवरून फोटो, व्हिडिओ क्लीप ,गेम्स आणि नेट बँकिंगही करता येतंय...हे नवीन फोन कॉम्प्यूटरमध्ये वापरण्यात येणा-या सॉफ्टवेअरवर आधारीत असल्यामुळे हॅकर्सचं फावलंय.
स्मार्ट फोन धारकांनो सावधान...तुमच्या फोन मधील सगळी माहिती......तुमची प्रत्येक व्हि़डिओ क्लिप ... तुमचे फोटो.. प्रत्येक कॉन्टॅक्ट नंबर....तसेच फोनमधून करण्यात आलेलं प्रत्येक नेट बँकिंग ट्रांजेक्शन... हे सगळ काही या व्यक्तीच्या हाती लागलंय....
या व्यक्तीने आतापर्यंत हजारो बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतलीय.अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेले खासगी क्षणही या व्यक्तीने वेबसाईटवर टाकले असून त्यामुळे त्या मोबाईल फोनधारकांना नाहक बदनामी सहन करावी करावी लागलीय...
हजारो लोकांच्या फोनमध्ये स्टोअर असलेले कॉन्टॅक्टनंबर मार्केटिंग कंपनिला परस्पर विकले आहेत..तो तुमच्या मोबाईल फोनचं सीमकार्ड क्लोन करुन एखाद्या दहशतवादी संघटनेला विकू शकतो.
स्मार्ट फोनची बॅटर लवकर डिस्चार्ज होते त्यामुळे लोक सार्वजनिक चार्जरवर मोबाईल चार्ज करतात...पण तिथंच त्यांची चूक होते. आपल्या मोबाईल फोनमध्ये स्टोअर असलेला डेटा चार्जरच्या माध्यमातून गुपचूपणे काढून घेतला जात आहे याची मोबाईलधारकाला जराही कल्पना येत नाही.
होय ...सार्वजनिक चार्जरच्या माध्यमातून चार्जिंग करत असतांना तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो....आणि त्याचाच गैरफायदा हॅकरकडून घेतला जात आहे. तेव्हा सार्वजनिक चार्जरवर स्मार्ट फोन चार्ज करण्यापूर्वी आता आम्ही तुम्हाली जी छायाचित्र दाखवणार आहोत त्याचा विचार करा.
कॉमन चार्जिंग पॉईंट अर्थात सार्वजनिक चार्जरवरुन स्मार्ट फोन चार्ज केल्य़ामुळे तुमचा मोबाईलफोन तीन पद्धतीनं फोन हॅक केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..आणि सर्वात मोठा धोका म्हणजे तुमच्यावर 24 तास लक्ष ठेवलं जाऊ शकत.... तसेच तुमच्या बँक खात्यातील रक्कम गायब होऊ शकते....
महागड्या स्मार्ट फोनचा वापर करुन अवघी दुनिया आपल्या मुठीत घेणार असाल तर तुमचं प्रत्येक गुपीत तुमच्या मुठीतून काढून घेण्यासाठी हॅकर्सही असूसले आहेत.. कदाचित तुम्हाला ठावूक नसेल..स्मार्ट फोन हा सॉफ्टवेअरवर आधारित असून कंम्पुटर प्रमाणे तो सहज हॅक केला जाऊ शकतो..
तुमच्या फोनच्या मेमरी स्टोअर असलले बँक ट्रान्जेक्शन...जिवनातील ते प्रत्येक क्षण जे तुम्ही फोनमध्ये स्टोअर करुन ठेवले आहेत ते जराही सुरक्षित नाहीत..... पण हे सगळं काही तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्ट फोन चार्ज करण्यासाठी कॉमन चार्जींगचा वापर करतात.. ..
वास्तविक पाहता स्मार्टफोनच्या इनबिल्ट फंक्शनमुळे फोन लवकर डिस्चार्ज होते,आणि प्रत्येक वेळेला चार्जर सोबत ठेवणं हे सेलधारकाला शक्य होत नाही... म्हणूनच कॅण्टीन, ऑफिस, रेस्टोरंट, ट्रेनच्या एसी कंपार्टमेंटमध्ये सोय म्हणून असलेल्या कॉमन चार्जरचा वापर केला जातो....
5 PIN USB केबलच्या मदतीनं हॅकर्स कॉमन चार्जिंग पाँईंट लॅपटॉपशी जोडतात.
फोन चार्ज होत असताना हॅकिंग द्वारे डेटाची चोरी
हॅकिंगसाठी स्पाय डिव्हाईसचाही वापर
स्पाय डिव्हाईसच्या मदतीनं दूरवर बसून मोबाईल फोनचं हॅकिंग शक्य
स्पाय एप्लिकेशनच्या मदतीनं 20 सेकंदांत मोबाईल फोन हॅक
मोबाईल कंपन्या स्मार्ट फोनमध्ये जे एडव्हान्स फिचर देतात त्यामुळेच हॅकर्सना हॅकिं